एव्हरेस्ट सर केल्यावर हिलरीला विचारलं की जगाच्या सर्वोच्य ठिकाणी पोहोचल्यावर तुम्हाला काय वाटलं? तर तो म्हणाला एकतर तिथे उभं रहायला जागा कमी होती आणि दुसरं म्हणजे परतायची घाई होती.

त्याला विचारलं की आता परत आल्यावर तुम्हाला कसं वाटतयं? तर तो म्हणाला घरातली बेडरूम ही बहुदा सगळ्यात सुखासीन जागा आहे!

अत्यंत निर्वैयक्तिकपणे पाहिलं तर चंद्रावर जाण्यासाठी करावी लागलेली प्रचंड मेहेनत, नैसर्गिक संपतीचा अपरिमीत अपव्यय आणि हाती आलेले सुख किंवा इथल्या जीवनमानाला आणि लोकांना त्याचा झालेला उपयोग याचे गुणोत्तर शून्यापेक्षा किती तरी कमी आहे. एवढ्या खर्चात किती तरी लोकांचे जीवनमान उंचावता आले असते, किती तरी विधायक काम करता आले असते, केवळ मानसिक समाधान आणि इगो ग्रॅटिफिकेशन शिवाय आपण काय साधले? चंद्रावर पाणी आहे किंवा नाही आणि तिथल्या मातीचे विश्लेशण या व्यतिरिक्त काय हातात आले आहे?

संजय