जिज्ञासा आणि स्वतःच्या फँटॅस्टीक कल्पनंसाठी इतरांना कामाला लावणे फार वेगळे आहे. जिज्ञासेत तुम्ही स्वतःचे तन, मन आणि धन कामाला लावता आणि त्यातून आनंद मिळवता,  सत्ता आहे किंवा पैसा आहे म्हणून इतरांना कामाला लावत नाही.

सिंहगड, पर्वती, वेताळ टेकडी या विहाराच्या जागा आहेत पण चंद्र आणि मंगळ या ग्रहांवर जाणे अत्यंत जिकीरीचे आहे त्या साठी तुम्ही इतर अनेकांना कामाला लावता.  अत्यंत प्रगल्भ मानवी बुद्धीचा निष्कारण अपव्यय होतो, ती जिज्ञासा नाही. साडे तीन लाख डॉलर खर्च करून झीरो ग्रॅव्हिटीत चालणारे बॉलपेन बनवणे ही बुद्धीमत्ता की तिथे पेंन्सिल वापरणे ही हुशारी?

आणि खरं तर जिथे आपण काही करू शकत नाही तिथे चर्चा करणं हा माझा अजिबात उद्देश नाही, अशा चर्चात मी सहभागी देखील होत नाही. मी माझ्या लेखनातून ज्याना ते पटेल त्यांना जीवन सहज, सोपे आणि आनंदानी कसे करता येईल हे सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण जीवन हीच सगळ्यात बहुमोल गोष्ट आहे, भन्नाट आयडिया काहीही उपयोगाची नाही. लोकसंख्ये सारखा अत्यंत उघड प्रश्न समोर असतान भारत जर चंद्रयान मोहीम राबवणार असेल तर मी काय करू शकतो? मी  फक्त ज्यांच्या पर्यंत पोहोचू शकतो त्यांना, माझं पटलं तर, कमीत कमी प्रयत्नानी मजेत कसं जगावं हे सांगू शकतो.

कल्पना हा मी बुद्धीमत्तेचा फार मोठा पैलू समजतो त्यामुळे हिलरीचा अनुभव मला स्वतः एव्हरेस्टवर जाण्यापेक्षा जास्त उपयोगी वाटतो. बघा पटलं तर.

संजय