sureshnaik येथे हे वाचायला मिळाले:
साहित्यनिर्मिती आणि प्रकाशन सोहळे, दोन्ही ऐन भरात आहेत.आठ पंधरा दिवसांनी गोव्यात पणजीत, नाही तर अन्य एखाद्या गावात,शहरात पुस्तक प्रकाशनाचा समारंभ ठरलेला.लेखकाचा, रसिकांचा आणि आयोजकांचाही याबाबतीतला उत्साह उतू जाणारा. इतक्या सातत्याने आणि सुविहितपणाने हे सोहळे होत आहेत, की एखाद्या कार्यक्रमानंतर लगेचच दुसऱ्या तशाच कार्यक्रमाची वर्दी नाही मिळाली,की चुकल्या चुकल्यासारखे वाटते. एवढी या कार्यक्रमांची आताशा सर्वांनाच सवय लागली आहे.त्याचे स्वागतही तेवढ्याच अप्रूपानिशी चाललेले असते. कार्यक्रमाच्या ...