धर्म, भक्ती, सामाजिक उपक्रम यांचे नाव पुढे करून वारंवार जी हुल्लडबाजी, गोंधळ, आरडाओरडा केला जातो त्यातून आपल्या समाजाच्या कोणत्या संस्कृतीचे व मानसिकतेचे दर्शन घडत असावे? राष्ट्रपुरुषांच्या पुण्यतिथीला, गणपती - नवरात्र इत्यादी उत्सवांना रस्त्यांत केले जाणारे उन्मुक्त वर्तन, मद्यप्राशन, 'शक्तीप्रदर्शन' इत्यादी उपद्रवकारक गोष्टी आणि समूहमन यांचा ताळमेळ जोडायला गेल्यास कधीही ही अशी माणसे, अशी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते हे लक्षात येते. त्यासाठी त्यांची शक्ती विधायक, समाजास उपयुक्त कार्यात लावण्याची गरज आहे!