'भारतरत्न' या पुरस्काराचे महत्त्व अशा चर्चांनी कमी होते. 'सचिन' हा क्रिकेट मधला उत्तम खेळाडू असला तरी क्रिकेट हेच जणू भारत देशाचे सर्वस्व असल्याचे भासवले जात आहे ते चुकीचे आहे. ही चर्चा काही लबाड राजकारण्यांनी चालू केली आहे व त्याला भारतातली क्रिकेटवेडी जनता बळी पडली आहे.
भारतरत्न हा पुरस्कार फक्त काळावर ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिंनाच देण्यात यावा. उदा. - विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांघी, बाबा आमटे, जेआरडी टाटा वगैरे!