अध्यात्माची सुरुवात आपण देहापेक्षा वेगळे आहोत ही आहे त्यामुळे अध्यात्म समजण्यासाठी तुम्हाला जगाकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन प्रथम आत्मसात करायला लागतो नाहीतर तुम्हाला समजण्याची शक्यता शून्य असते. आता तुमच्या प्रतिसादाला उत्तर:

१) "तुमच्या विनंतीला मान देऊन तुमचे लेखन स्त्री-पुरुष या ऐवजी माणूस असा अद्वैतसूचक शब्द वापरून वाचून पाहिले तर काहीच अर्थबोध झाला नाही....पण सगळेच फुसकाट निघाले"

माणूस हा अद्वैत सूचक शब्द नाही, जाणिव एक आहे   हे तुम्हाला लक्षात आले नाही त्यामुळे तुम्हाला काहीही कळले नसणार हे उघड आहे

२) मी सुरूवातीलाच स्त्री आणि पुरुष यांचे अभिप्रेत अर्थ सूचीत केले आहेत आणि ते सर्व लेखनाला लागू आहेत हे बहुदा वरील स्पष्टीकरणावरून तुमच्या लक्षात येईल. अर्थात स्त्रियांची मानसिकता किंवा पुरुषांची मानसिकता वर्णन करताना मी ते पुन्हा नमूद केले आहे एवढेच. पण तुम्ही त्यात स्त्रीची मानसिकता दाखवून तुमच्या सोयीचा अर्थ काढला (आणि त्या अँगलअनी तो हमखास निघणारच!);  हे बघा: 

"स्त्रियांनी अर्थार्जन केले की सहजीवनाचा बोजवारा कसा काय उडतो? पुरुषाने केले की उडत नाही. तणाव निर्माण होत नाही.  हे तुमचे अद्वैत काही कळले नाही."

आता अर्थार्जन हेच तणावाचे मुख्य कारण आहे तिथे स्त्री-पुरुष असा भेद नाही. तुम्ही जे काय सुसाट सुटलात की बोलायची सोय नाही! तुम्ही पुरुषाची मानसिकता वाचलीच नाही तिथे मी ते तणावाचे प्रथम कारण नमूद केले आहे.

"स्त्रियांनी अर्थार्जन करून देहाची हेळसांड न करता २४ तास घरात सहजीवनासाठी उपलब्ध असावे असे तर नाही ना म्हणायचे? म्हणजे तुमच्या मते सुखी सहजीवनासाठी कुणीच अर्थार्जन करायचे नाही की काय? व्वा व्वा. छान छान"

तुम्ही हे निष्कर्श स्वतःच्या बुद्धीनी काढले आहेत, माझ्या लेखनात मी सुखी सहजीवनाचा सरळ आणि साधा उपाय श्रम-विभागणी सुचवला आहे. अर्थार्जन स्त्री नि केले काय आणि पुरुषानी केले काय त्यानी काहीही फरक पडत नाही, तुमचे एकमेकात ट्युनिंग कसे आहे, तुम्ही पैसा स्वतःचा समजता का कुटुंबाचा, यावर सहजीवनाची मजा किती येणार हे ठरते.   

३) "इथेही वाट कशी आणि कोण लावते ते स्पष्ट नाही. इगो इशू कोण करते ? तुमचे अद्वैतच करत असेल तर त्यासाठी ओरड कशाला?"

हा थोडा नाजूक विषय आहे पण तुम्ही तारा छेडल्या आहेत तर बोलू.  आता इथे मी रूढ अर्थाने स्त्री आणि पुरुष हे शब्द वापरतो. स्त्री ही सदैव अबला मानली गेली आहे आणि प्रणयाची गरज फक्त पुरुषाला आहे असे युगानयुगे जनमत आहे त्यामुळे पुरुषावर बलात्कार झाला किंवा अन्याय झाला असे कुणीही मानत नाही. तुम्ही अत्यंत निर्वैयक्तिक पणे बघीतले तर उर्मी आणि मजा दोघांना आहे आणि तीच निसर्गाची योजना आहे. पण अशा परिस्थितीत पुरुष हा नेहेमी रिसीविंग ऐंडला राहणार आहे आणि हे तणावाचे एक फार छुपे कारण आहे. पुरुष म्हणून मी हे अनुभवानी (माझ्या आणि अनेकांच्या) लिहीले आहे. 

आता इथे ही तुम्ही तुमच्या बुद्धीमत्तेची चुणुक दाखवली आहे :  " तुमचे  अद्वैतच करत असेल तर त्यासाठी ओरड कशाला?" अद्वैत म्हणजे जाणिव, ती काहीही करत नाही ती फक्त असते. ती दोघांची एकच असल्यामुळे प्रणयात एकरुपता साधते 

४) "आयुष्य सार्थकी लावाचया एकच मार्ग सुखी सहजीवन. नैसर्गिक संपत्तीत वाढ करायची म्हणजे प्रजोत्पादन का"?

तुम्ही थोड्या जरी शांत बसलात तर तुमच्या लक्षात येईल की माणसाचा सगळा प्रयत्न हा शांत आणि आनंदात जगण्यासाठी आहे. सहजीवन हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे.

नैसर्गिक संपत्ती म्हणजे रॉ मटेरियल (प्रजोप्तादन नव्हे). जेंव्हा गरज नसताना रॉ मटेरियल वापरून उप्तादन केले जाते तेंव्हा पुढच्या पिढ्यांच्या जीवनमानावर त्याचा परिणाम होत असतो कारण निसर्ग हा त्याच्या पेस नि रॉ मटेरियल तयार करत असतो. तुम्ही एकदा उत्पादन केले की त्याचे परत विघटन होऊन त्याचे रॉ मटेरियल होणे अत्यंत वेळ घेते.

"कार्यमग्न राहण्यात काय वाईट आहे? तुम्ही असले लेखन करून लोकांचा वेळ वाया घालवला असे कुणी म्हटले तर? म्हणणारा म्हणू शकतोच ना? ( मी तसे म्हणणार नाही कारण माझी छान करमणूक झाली आहे)"

तुम्हाला कल्पना नसेल पण बहुतेक पुरुष घरी जाऊन कटकट नको म्हणून ऑफिसमध्ये बसलेले असतात त्यात कार्यमग्नता वगैरे काही नसते. रमायला काही नाही म्हणून रूटीन नाईलाजाने ओढणे अशी जवळ जवळ सगळ्या समाजाची परिस्थिती आहे. दिवस काढणे आणि सीरियल्स किंवा क्रिकेट बघून झोपणे या शिवाय लोकांच्या जीवनात काही नाही!

तुमची करमणूक कशी होईल? तुमचा उद्वेग वाक्यावाक्यात दिसतो आहे. मला मात्र लिहीताना मजा येतेय कारण तुम्ही माझं लेखन कसं वाचू नये हे लोकांना सांगायला मदत केलीयं.

वेळ ही कल्पना आहे, तो वाया जातो जीवनात रमता न आल्यामुळे. माझ्याकडे भरपूर वेळ असतो आणि मी माझ्या आनंदासाठी लिहीतो. तुम्हाला माझा अर्थ न कळल्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. मी काहीही करमूण प्रधान लिहीलेलं नसताना तुम्ही स्वतःचे अर्थ काढले आहेत आणि उद्विग्नतेला करमणूक म्हणता आहात.   

५) "म्हणजे अगदी 'काम' आणि 'अर्थ' यांनाच प्रमुख मानून स्त्रियांना चारित्र्याच्या संशयावरून किंवा हुंड्यावरून मोक्ष देणाऱ्यांच्या विचारात आणि या लेखातील विचारात मला तरी काही फरक दिसला नाही."

इथे तुम्ही बुद्धीमत्तेचं एव्हरेस्ट गाठलं आहे. स्त्री हत्या म्हणजे मोक्ष नाही, आपण देहापेक्षा वेगळे आहोत हे समजणे 'जाणिव' या मोक्षापर्यंत नेणाऱ्या पैलूची ओळख हा लेखनाचा हेतू आहे. तुम्ही स्वतःला स्त्री समजता आहात आणि त्यामुळे पुरुषांच्या जाम विरोधात आहात हे तुमच्या कन्क्लूडिंग रिमार्क वरून दिसतं आहे.   

"ज्यामच विनोदी वाटले एकंदरीत सगळे"

तुमच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टीकोनामुळे तुम्ही इतक्या ज्याम वैतागला आहात की तुम्हाला त्रास आणि विनोद यातला फरक देखील जाणवेनासा झाला आहे.  

एकदा आपण स्त्री नसून स्त्री देहाची आपल्याला फक्त जाणिव आहे आणि जीवन हा स्त्री आणि पुरुष प्रकटनातला समन्वय आहे असा विधायक दृष्टीकोन ठेवून वाचून बघा तुमचे जीवन आनंदी होईल.

संजय