उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:

"सई, तू मोठी झाल्यावर कोण होणार?" हा प्रश्न मला अगदी चार वर्षांची असल्यापासून विचारण्यात येतोय. हो अजूनही. त्याचं उत्तर मात्र नेहमी बदलतं. हो अजूनही!!
लहानपणी "मोठं होणं" ही एक लठ्ठ काळी कुळकुळीत रेष होती. एक दिवस ती ओलांडायची, मग त्यानंतर आयुष्य खूप सोपं होणार होतं. महत्त्वाचे निर्णय जसं की जेवणाच्या वेळेला उडदाच्या पापडाच्या लाट्या खाव्यात की नाही, किंवा साधारणपणे किती वेळ आजारी न पडता हौदात खेळता येतं वगैरे घेता येणार होते. मोठं झाल्यावर बाबाची अंथरुणातून मला खसकन ओढून बाथरूममध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी संपणार होती. तसंच मला ...
पुढे वाचा. : मोठी झाल्यावर कोण होणार?