'भारतरत्न' या पुरस्काराचे महत्त्व अशा चर्चांनी कमी होते - सहमत...
पण, वयाचा विचार करायचा झाला, तर सामान्यतः हा पुरस्कार जीवनगौरव पुरस्कारप्रमाणे आयुष्यभराच्या कर्तुत्वावर दिला जावा ह्यात दुमत असायचे कारण नाही, पण, खेळ हा विषयच असा आहे की, खेळाडूची कारकिर्द पस्तिशीमध्ये संपते. त्यामुळे एखाद्या खेळाडूला हा पुरस्कार मिळणार की नाही हे त्याच्या चाळीशीच्या आत ठरवणे अवघड नसावे. सचिन हा लोकप्रियता आणि कर्तुत्व ह्या दोन्ही दृष्टिनी योग्यच आहे. तसेच आनंद देखिल, पण पेस हा तितकासा यशस्वी आहे अस म्हणता येणार नाही. किती टेनीस खेळाडू पेस चा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात ह्याचा विचार केला तरी ह्याचे उत्तर मिळेल.
राजकारणाबद्दल न बोलणच बरं, राजकारण्यांना अजूनही असं वाटतं की पुरस्कार 'ते' देतात.