श्री. टग्या,
आपण या गोष्टीवर एवढा विचार केला हे पाहून समाधान वाटले. गोष्टीचं तात्पर्य वाचकानेच ठरवावं. तुम्ही काढलेली सर्व तात्पर्ये कोणाकोणासाठी बरोबर असतील, पण तुम्हाला स्वतःला लागू असलेलं तात्पर्य काय आहे?
माझ्यापुरतं बोलायचं तर या गोष्टीचं तात्पर्य एवढंच की हे जग आणि मानवी आयुष्य अतर्क्य, अनाकलनीय अशा घटनांनी भरलेलं आहे आणि आपण जे 'सुख' मिळवायला धडपडत असतो ते आपल्याला कधी स्पर्शून गेलं तेही आपल्याला कळत नाही.