अप्रतिम. निःशब्द झालों. संवेदनाहीन सरकारी अधिकाऱ्यांना फक्त आंकड्यांशी खेळायचें असते. भीष्म साहनींनीं तमस मध्यें दाखवलें आहे तसें.

तिन्ही पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून नियमित मदतीव्यतिरिक्त प्रत्येकी एक लाखाची मदत. तिघांच्या पत्नींना सरकारी नोकरी. तिघांचीही पहिली नावं घेत पालकमंत्री आपुलकीनं बोलले. त्यांचे डोळे पाणावले होते.
हँ फक्त बातमीपुरतें जाहीर करतात. प्रत्यक्षांत कुणाला अशी मदत मिळाल्याचें ऐकिवांत नाहीं. संबंधितांनीं कितीही खेटे घातले तरी मदत लाल फितीत अडकवून ठेवतात.

एखादाच संवेदनाशील अधिकारी उद्वेगांत बुडतो आणि झाडाझडतीसारझी साहित्यकृती तयार होते.

नक्षलवाद्यांचा लढ्याचा मार्ग चुकीचा आहे हें मान्य करावें लागलें तरी धनदांडग्यांच्या दबावाखालीं हडेलहप्पी करणाऱ्या सरकारी लोकांशीं गरीब सामान्य माणूस लढा तरी कसा देणार? भावना पूर्ण बाजूला ठेवल्या तरी नक्षलवाद्यांचे तत्त्वज्ञान संपूर्ण चुकीचें म्हणता येणार नाहीं. नैतिकता आणि कायदा वाकवणारी हडेलहप्पी कोणत्या थराला पोहोंचते हें आपण रायगड 'विशेष आर्थिक क्षेत्र' ऊर्फ एस ई झेड प्रकरणीं पाहिलें आहेच. मेधा पाटकर ना तर माथेफिरूच म्हणतात.शब्द बापुडे .... आणखी काय?

उत्कृष्ट विचारप्रवर्तक कथा वाचल्याचें समाधान मिळालें.

सुधीर कांदळकर