Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:
गोव्याला अमली पदार्थ व्यवहाराच्या खाईत ढकलून देणाऱ्या ड्रग माफियांची साथसंगत केल्याचा ठपका ठेवून पाच पोलिसांना काल निलंबित करण्यात आले. "यू ट्यूब'वरच्या दोन व्हिडिओ क्लिप्सनी गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्यामुळे ही कारवाई केली गेली हे उघड आहे. ड्रग माफिया आणि गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी विभागातील काही अधिकाऱ्यांची शय्यासोबत गेली अनेक वर्षे उघडउघड चालल्याचा आरोप होत होता. कित्येकांचे उखळ या व्यवहारात पांढरे झाले. परंतु या आरोपांची सत्यासत्यता तपासण्यासाठी खोलात जाण्याऐवजी सारे काही आलबेल ...