मीं फारच लहान म्हणजे पांचेक वर्षांचा होतों. आमच्या तीर्थरूपांचे चोपडे नांवाचे मित्र चळवळीचे कार्यकर्ते होते. आमच्या इमारतीच्या समोरच महापालिकेचा गॅसचा दिवा रुपेरी नक्षीदार खांबावर होता. त्या दिव्याला वर तिरकी तरफ असे. ही तरफ वरखाली करून दिवा चालू बंद केला जाई. हा दिवा अगोदर कुणीतरी बंद करी. मग चळवळीचे कार्यकर्ते घरांघरांत लपूनछपून आश्रयाला येत. दिवा बंद केला कीं मुलांना भीती वाटे व गॅलरीत खेळणँ बंद करून आम्हीं घरांत जात असूं. मग ते व आमचे ती. जेवत. मग चहा पीत आणि बाराबारा वाजेपर्यंत दबक्या आवाजांत बोलत बसत. आम्हीं मुलें मात्र नऊसाडेनऊला झोंपीं जात असूं. १ मे १९६० ला मात्र ते पेढे घेऊन आल्याचें स्मरतें. बाकीचें काहींच आठवत नाहीं. पण घरीं टेलिफोन नसतांना चोपडेकाका येणार असल्याचें आमच्या तीर्थरूपांना कसें कळे ठाऊक नाहीं.
कविता वाचून अचानक आठवणी जाग्या झाल्या.
सुधीर कांदळकर