आपलीं मनें निबर, नव्हे बेरड झालीं नाहींत. कायदा, समाजव्यवस्था यापुढें आपलें कांहीं चालत नाहीं.
पण तरी बरेच प्रश्न उभे राहातातच. तो एवढा बी एस सी केमिस्ट्री झाला. तो इतकी वर्षें बेकार कसा. त्यानें कांहींच हातपाय कसे हलवले नाहींत? घर सोडून पळून कां गेला नाहीं. त्याची जगण्याची इच्छा, सकारात्मक वृत्ती कुठेंतरी नक्की कमी पडली. अशा परिस्थितींत माणसें उचल खाऊन पुढें येतात. डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे जीवनसंघर्षाला कमी पडला - नॉट फिट फॉर सर्व्हायव्हल - म्हणून नामशेष झाला.
सुधीर कांदळकर