रक्तवाहिन्यांसारखे चार चार पदरी रस्त्यांमधून ऑक्सिजन ऐवजी कार्बन डाय ऑक्साइड वाहत असेल तर काय होणार? (बघा अत्यंत प्रगत देश आणि विकसनशील देश) टेकड्या वृक्ष संवर्धित करण्याऐवजी त्यांचे सपाटीकरण (बघा पुणे..)खनिजांचा अमर्याद उपसा (बघा कुठला पण देश) पृथ्वीचे फुफ्फुस म्हणवणारे ब्राझीलच्या घनदाट जंगलांवर होणारे माणसाचे अतिक्रमण, नष्ट होणारे उपयुक्त वायुमंडल आणि तरीही मानवाची न शमणारी खा.... बघून फक्त एक बाब स्पष्टपणे जाणवते ती म्हणजे मानवाचा स्वार्थीपणा‌. साधे दोन उदाहरण पुरेसे आहेत हो.. एक म्हणजे अणू ऊर्जेपासून बाँब आता अतिरेकी पण बनवू शकतात पण अणूउर्जेचा विधायक उपयोग समस्त मानव जातीसाठी अजूनही होत नाही... दोन म्हणजे, सौर ऊर्जेचं तंत्र अजूनही पाहिजे तेव्हढे विकसीत नाही. मंगळावर यान पाठवू शकणारा मानव हे साध्य करू शकला नाही, हे पटत नाही.२०१२ हे वर्ष मानवजातीचे अंतिम असेल असे वाटत नाही पण मानवाच्या विधायक प्रगतीचा प्रवास स्स्स्स्स्स्स...... तितकासा ठीक नाही असे खेदपूर्वक नमूद करतो.