सचिनचे अप्रेझल करणारा अजून जन्मला यायचाय. आपण त्याच्या खेळाची चिकित्सा आपण करणे म्हणजे काजव्याने सुर्याच्या प्रखरतेमध्ये उणिवा काढणे आहे. किंवा तुमच्या कार्पोरेट भाषेत असिस्टंट ट्रेनिने सी. ई. ओ. चे अप्रेझल करणे आहे.

व्यक्तिपुजा मलाही मान्य नाहि. पण खेळाडूम्हणून सचिनचे मोठेपण त्याचे शत्रुही (असलेतर) मान्य करतिल.

तसेच कविच्या प्रतिभेलाही दाद दिलिच पाहिजे. सचिनची द्वीशतकी खेळी त्यानी आरतीच्या बाजामध्ये चपखल बसवली आहे.

बाकी मॅनेजर म्हणून तुम्ही चांगलेच नाव काढत असणार ह्यात वादच नाहि.