मुक्तांगण येथे हे वाचायला मिळाले:
आमच्या बॅडमिंटनच्या क्लासमधे बाहेरच्या मोकळ्या जागेत मी, आस्था आणि उमा टॉस करत होतो. छान संध्याकाळ होती, अधून मधून उन डोकावत होतं. खाली खडीमुळे जरा हललो कि आवाज येत होता. आदित्य आत गेम खेळत होता त्यामुळे मी आस्था, उमा सोबत खेळत होते. शटल उमाकडे गेल्यावर उमा जोरात ओरडली "हा माझा बेस्ट शॉट!" आणि तिने शटल उडवले, ते ...