"शुद्ध करी चित्त म्हणजे अखंड शुभ विचाराने जाणीवेचे शुद्धीकरण करणे आणि उत्तम मार्गदर्शकाला चित्तात घट्ट धरून सत चित आनंद पदवी प्राप्त करून घेणे. "

-  संजय यांनी मांडलेल्या विचारानुसार शुद्ध/ अशुद्ध किंवा शुभ/ अशुभ असे द्वैत निर्माण करणे हा निराकाराला जाणण्यात अडथळाच ठरेल. मूळ स्वरूप सगळ्या पलीकडे, अनिर्वाच्य असल्याने अशुद्ध कशाला म्हणणार,  आणि शुद्धीकरण कशाचे करणार? शुद्धीकरणाचा हा खटाटोप भ्रामक मनोव्यापाराच ठरेल.

शिवाय  उत्तम मार्गदर्शकाला चित्तात घट्ट धरून ठेवणे,  एकनिष्ठ पणे सगुण भक्ती करणे यासारखे प्रकार (जे ज्ञानदेवांना मान्य आहेत, आणि कदाचित भक्तिमार्गावर उपयुक्त असू शकतात) संजय यांनी प्रतिपादन केलेल्या विशुद्ध ज्ञानमार्गावर अपकारक ठरतात असे त्यांचे स्पष्ट मत (आणि स्वानुभव) असल्याचे दिसते. यात माझा कुठे गैरसमज होत असल्यास अवश्य निराकरण करावे.  ते उद्बोधकच ठरेल.