आपण सर्व पोहोचलेलोच आहोत, मला हे समजलं आहे, तुम्हाला ते समजलेलं नाही पण म्हणून तुम्ही पोहोचलेले नाही हे मी मान्य करायला तयार नाही. तुम्ही जरी स्वतःला जरी निराकार मानत नसाल तरी त्यानी तुमचे मूळ स्वरूप काही बदलत नाही कारण ते तुमच्या मान्यतेवर अवलंबून नाही.

हीच तर अध्यात्मातील सर्व मार्गांची फलश्रुती आहे. जे जग जसे आहे तसेच ते दिसावे हीच तर सर्व संतांची धडपड आहे. सर्व संत व सिद्ध याच बोधावर स्थिर असतात. ज्ञानमार्गाच्या अधिकारी व्यक्तीला प्रयत्न करायला सुरवात केल्यावर तो या बोधावर स्थिर व्हायला सहा महिने पुरू शकतात अस तर ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलंय. "जे भेटे भूत ते भगवंत" अशी ही अवस्था आहे. भले ते भेटलेले भूत स्वतःला भगवंत मानो अथवा न मानो. (भूत हा शब्द भूतमात्र या अर्थाने वापरला आहे. )

पण आपला "मी जीव ऐसा संकल्प" इतका खोलवर गेलेला आहे की, संजय क्षीरसागरजी काय सांगत आहेत ते कळणे कठीण होऊन बसते. हा फरक लक्षात आला तर मात्र त्यांच्या लिखाणात काहीही वावगे वाटणार नाही. तसेच त्यांचा मार्ग आपल्याला झेपेल किंवा नाही हे ठरविणेही अवघड जाणार नाही. हा संकल्प किती खोल गेलेला आहे यानुसार मार्ग ठरवायला लागतो. हे सर्व संतांना माहीत असते म्हणूनच शिष्याचा संस्कार (संकल्पाची तीव्रता) पाहून त्याला जो झेपेल असा मार्ग सांगतात.  इतकेच नव्हे तर यासाठी वैयक्तिक मार्गदर्शनाचे महत्त्व सर्व संत प्रतिपादन करत असतात. जगाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे मार्ग असू शकतात असे विवेकानंद का म्हणतात तेही यातून कळू शकेल असे वाटते. पण माझ्या मतानुसार सर्व संत काय सांगत आहेत हेच त्यांच्या शिष्यांना जर नीट कळले नाही किंवा अर्थाचा विपर्यास जर झाला तर मात्र त्यातून एकत्वाकडे जाण्याऐवजी पंथ अथवा संप्रदायांना सुरवात होते. यास्तव अध्यात्माच्या प्रांतात कुणाची योग्यता किती आहे हे कळणे अवघड समजले जाते. एक संतवचन असे आहे की,  फक्त संतच दुसऱ्या संताला ("मी जीव ऐसा संकल्पाचा संपूर्ण अभाव असलेला") जाणू शकतात. असो.

उत्तर व स्पष्टीकरण आवडले.