अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
काही वर्षांपूर्वी पर्यंत पुणे- मुंबई हा प्रवास बहुतेकजण रेल्वेनेच करत असत. एकतर तेंव्हा अतिजलद मार्ग नव्हता आणि दुसरे म्हणजे रेल्वेचा हा प्रवास मोठा आरामदायी आणि सुखकर असे. त्या वेळी वातानुकुलित डबे नसत. त्यामुळे प्रथम वर्ग किंवा दुसरा वर्ग या दोन्ही वर्गात खिडक्या उघड्या टाकून आत येणारा भसाभसा वारा अंगावर घ्यायला मोठी मजा येत असे. खंडाळा आणि कर्जत या दोन स्थानकांच्या मधे गाडी ब्रेक टेस्टींग साठी उभी रहात असे या ठिकाणी गाडी उभी राहिली की काळ्या सावळ्या पण रेखीव दिसणार्या व गुढग्यांच्यावर घट्ट नऊवारी लुगडे नेसलेल्या कातकरी मुली, करवंदे, ...
पुढे वाचा. : कातकरी