व्यक्तिगत हेत्वारोप करणे आणि हा मोठा की तो मोठा यात मला ही स्वारस्य नाही. विषयाच्या ओघात जे लिहिले, त्या वरून तसा ग्रह होत असेल तर ती माझ्या अभिव्यक्तीची मर्यादा. मी आज जसा आहे, मला आपल्या मर्यादा आणि अपूर्णतेची जाणीव पदोपदी होते. मी पोचलेलो नाही. माझ्या दृष्टीने अशा स्थितीत बनचुकेपणाने काही बोलणे, किंवा इतर कुणाचे मूल्यमापन अधिकारवाणीने करणे ही आत्मवंचनाच ठरेल. तसा प्रमाद लिहिण्याच्या ओघात घडून गेला, त्या बद्दल दिलगीर आहे. संजय यांच्या औदार्याबद्दल मी त्यांचा  मन:पूर्वक ऋणी आहे. इति लेखनसीमा.