तुमच्या या पूर्वीच्या आणि या प्रतिसादांवरून तुम्हाला असे सूचीत करायचे दिसते की भक्तीमार्ग हा ज्ञानमार्गापेक्षा बरा आहे, एवढेच नाहीतर मी ज्ञानमार्गाचा पुरस्कर्ता आहे.
प्रथम मी तुमचा गैरसमज दूर करतो, माझा कोणताही मार्ग नाही, सत्य (किंवा निराकार) मला डोळ्यासमोर दिसते आहे, तुम्हाला ही ते माझ्या इतकेच दिसते आहे पण तुम्ही ते बघायला तयार नाही. मला जर गोष्ट डोळ्यासमोर दिसते आहे आणि तुम्हाला ही ती दिसते आहे हे मला माहिती असताना मी त्यात दुसरा कोणताही पैलू आणू शकत नाही. मी तुम्हाला भक्तीमार्ग विरोधी वाटतो कारण तुम्हाला काहीतरी अनुभव आलेले आहेत आणि त्यामुळे आणखी काही येतील आणि मग आपण सत्याप्रत पोहोचू असे वाटते आहे. मला कोणताही अनुभव नाही आणि मी कोणत्याही अनुभवाच्यामागे नाही कारण मी अनुभवणाऱ्यालाच गाठला आहे.
भक्तीमार्गी निष्कारण भावूक होतो आणि त्यामुळे त्याला डोळ्यासमोर सत्य आहे हे मान्य करता येत नाही. तुम्ही मला सहमत आहात असे दाखवता पण तुमचे मन तुम्हाला पुन्हा अनुभवाची ओढ लावते आणि मग तुम्ही माझ्यालेखनाचा उपयोग करून परत भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे इतराना सांगायचा प्रयत्न करता.
माझे तुम्हाला आगदी मनःपूर्वक सांगणे आहे की एक ठरवा तुम्हाला भक्तीमार्ग योग्य वाटत असेल तर तुमचं चालू द्या, माझ्याशी सहमत होऊ नका आणि माझं वाचू देखील नका कारण मी जे लिहीतो तो माझा अनुभव आहे; मी चूक असेन तरी माझी जवाबदारी मी माझ्यावर घेतलेली आहे, माझा भार कुणावरही नाही.
त्यातूनही तुम्हाला माझं बरोबर आहे वाटत असेल तर देव, अनुभव, अमका, तमका, कुंडलिनी, शक्तीपात आणि काय काय भारी भारी असेल ते निव्वळ वेळ काढण्याचे मार्ग होते मी ते आता सोडतो असं कायमचं ठरवून टाका आणि मग मला धन्यवाद देण्याएवजी स्वतःला धन्यवाद द्या कारण त्या क्षणी तुम्ही स्वतःची जवाबदारी स्वतःवर घेतली असेल, तुम्ही या सगळ्या गोंधळातून मोकळे व्हाल आणि तुम्हाला कायम समोर उभा ठाकलेला निराकार दिसेल.
संजय