कथेचे दोन्ही भाग अतिशय सुंदर आहेत. खिळवून ठेवणारे आहेत. कथा एकाच भागात लिहिली असती तरी चालले असते. शेवट आणखी थोडा वेगळा म्हणजे किशोर वेड्यांच्या इस्पितळातून सुटतो आणि पुढे काहीतरी त्याचे चांगले होते असा झाला असता तर किशोरसारख्या माणसाना अशा परिस्थितीतून बाहेर कसे काढायचे याचा एखादा उपाय सुचविता आला असता.

याचा अर्थ असा नाही की प्रस्तुत शेवट योग्य नाही. सर्वसामान्य आणि भिडस्त माणसे अशा परिस्थितीत पळून जाण्याचा मार्ग स्विकारत असतील तर ते भित्रे आहेत असे म्हण्टल्यास त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. सगळे काही अंगावर घेऊन आणि जसेच्या तसे स्विकारून अशा एखाद्या माणसाला मदत करणारी माणसे अपवादानेच आढळतात. ती माणसे फार वेगळी म्हणून जन्माला यावी लागतात. अर्थात हे पूर्णपणे माझे वैयक्तिक मत आहे. 

प्रस्तुत कथा 'रेशिमगाठी', 'श्रावणसरी' अथवा 'पिंपळपान' यासारख्या टिव्ही मालिकेत दाखवण्यासारखी आहे.

धन्यवाद, दिलसे