हरिभक्तजी नमस्कार,
मला वाटते की मी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करणारा एक सामान्य माणूस आहे. आणि म्हणूनच इतर जण असामान्य असण्याची शक्यता मी नेहमी गृहीत धरत असतो. ज्ञानमार्गाचा अधिकारी पुरुष एकदम व एकाएकी जन्मत नसतो. त्याची त्या अगोदरच्या अनेक जन्मात बरीच साधना झालेली असते. आपण सामान्य असल्याने त्याचे पूर्वीचे जन्म व त्याने केलेली कठोर तपश्रर्या जाणू शकत नाही. आपण सामान्य माणसे असल्याने कार्य व त्याचे कारण दोन्हीही जर एकदम सापडले तर ते संयुक्तिक समजतो. याउलट कार्य दिसले पण कारण अज्ञात राहिले तर मन गोंधळून जाते. आपण श्री. संजय क्षीरसागर यांनी विवेचन वाचले पण त्यांनी पूर्वजन्मात केलेली साधना आपण जाणू शकत नसल्यामुळे ते विवेचन आपल्याला पूर्णपणे गोंधळात टाकते. मी ते सर्व विवेचन मान्य केले कारण ते मला पटले आहे. पण त्या मार्गाने जायचे की नाही हे कर्मस्वातंत्र्य मला आहे व ते स्वातंत्र्य मी उपभोगणारही आहे. शिवाय त्याला श्री. संजय क्षीरसागर यांची काहीही हरकत नसणार आहे किंवा ते त्याबद्दल एक चकार शब्द बोलणार नाहीत ही माझी खात्री आहे. कारण मी कोणता मार्ग स्वीकारतो यावर त्याची अनुभुती अवलंबूनच नाही. मग आपण का बरे त्रास करून घ्यायचा?
मी हे सर्व लेख वाचले. त्यावर मनापासून प्रतिसाद दिला व विसरून गेलो. आजचे प्रतिसाद लिहिण्यासाठी संदर्भ म्हणून परत ते बघायला लागले इतकेच. गीता दातारांनी हा लेख लिहिला व त्यावरील तुमची प्रतिक्रिया पाहून तुमच्यासाठी थोडा भाग घेतला इतकेच.