वर्णन... स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर सरकारी राज यांत फरक वाटतच नाही. तोच वारसा हेही सरकार चालवत आहे. (वसईचा नवा प्रसंग पाहा.) वीस बावीस टक्के मते कागदोपत्री मिळवून निवडून येणारे राजकारणी हे सगळ्या जनमनाचे प्रतिनिधित्व करतात कां? ... हीच मेख खरे तर या दडपशाहीमागे असावी कां? यावर तोडगा जोवर निघत नाही तोवर अशी मुस्कटदाबी चालतच राहील. खरे तर प्रजासमाजवादाशी फारकत हीच काँग्रेसची इतिश्री समजावयास हवी. ही काँग्रेस बैलजोडी विसरली आहे. धमकी देणारा हात ही तर आता निशाणी झाली आहे. तो हात आश्वासक आहे असे नुसते म्हणायचे ! किंबहुना साऱ्याच पक्षांची अशीच अवस्था दिसते आहे.
बापाच्या मृत्यूचा 'निरोप' त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आणखी काळ जाऊ द्यावा लागणार होता.
- यावर काय बोलावे, शब्द मूक होतात.
अतिशय कसदार, विचारप्रवर्तक लेखन. श्रावणजी, अभिनंदन.