शांतता मूळ आहे ध्वनी हे प्रकटीकरण आहे, ज्या क्षणी आतली बडबड थांवेल (मग ते उधाण झालेलं मन असो की नाम असो)
अगदी बरोबर. शेवटी काहीच राहत नाही. नामस्मरण करणाऱ्या सर्व संतांनी हेच सांगितले आहे. पण ही माझी स्थिती मला करावयाची नाही तर ती स्थिती व्हावी अशी माझी इच्छा आहे. आग्रह नाही. म्हणून मला घाई नाही. मी त्यासाठी कितीही काळ थांबायला तयार आहे. तुम्ही जिथे पोहोचला आहात तिथेच जरी मला जायचे असले तरी ते मला माझ्या पद्धतीने व मार्गाने जायचे आहे कारण मला त्यात आनंद वाटतो. ते मला सुरक्षित वाटते. म्हणूनच तुमचे विवेचन सगळे पटूनही तुमचा मार्ग मी स्वीकारत नाही आहे. तुमचे मी सर्व मान्य केले त्याचे कारण एकच विवेकानंदाचा विचार - अनेक मार्ग असू शकतात. आणि मी माझ्याच पद्धतीने जात राहणार आहे कारण स्वतःचा मार्ग स्वतः निवडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.