सुरेख, विचारप्रवर्तक लेख. माहितीपूर्ण लिखाण म्हणजे नुसतेच माहितीचे संकलन नव्हे तर त्यामागची मीमांसा आणि लेखकाचे / लेखिकेचे स्वतंत्र विचार यांचा संगम असावा लागतो हे अधोरेखित करणारे लिखाण.
नूरबद्दल कौतुक वाटते. वाईटही. अशा व्यक्तींची पिढी आता लयाला गेली आहे असे वाटते. 'दुनिया मुझे छोटी लगती है, बेगम' म्हणणारा गालिब आठवतो.
 'जेम्स बाँड' चा जन्मदाता इयान फ्लेमिंग याचा भाऊ या काळात ब्रिटिश सरकारच्या दिल्लीतल्या हेरखात्यात काम करत होता
या अरभाट माणसावरही कुणीतरी लिहिले पाहिजे. इयानला बऱ्याच टीकाकारांनी अगदी किरकोळीत काढले आहे, पण त्याच्या भावाबद्दल बरेच बरे लिहिले गेले आहे.