कुत्र्यांप्रमाणेच इतरही निरुपद्रवी सजीवांना जगण्याचा आणि त्यांच्या जगण्यास आवश्यक कृती करण्याचा (मग माणसाला त्यातून त्रास झाला तरीही) अधिकार आहे.
कुत्र्यांच्या अधिकारांसाठी रक्त आटवणारे इतर अनेक प्राणि-कीटक विसरतात. उदाः उंदीर-घुशी, झुरळे, डास, मांजरी वगैरे. आणखी खोलवर विचार केल्यास, विविध जंतू, जिवाणू, विषाणू (विषाणू हे क्रुर माणसाने दिलेले नाव), बुरशी, तण वगैरे.
असे अनेक जीवसृष्टीतील घटक आहेत, की त्यांचा नाश माणुस विविध विषे, कीटकनाशके वगैरे वापरून करत असतो. त्या सर्वांवरही बंदी घातली पाहीजे.
कुत्र्यांना मारायचे नसेल, तर उंदीर-झुरळांनी काय घोडे मारले आहे?