अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:

मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना कॉलेजच्या वसतीगृहात रहात असे. वसतीगृहात रहाणार्‍या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी दोन मोठे मेस असत. प्रत्येक मेसमधे, ज्याच्यावर एकावेळी 20 ते 25 विद्यार्थी बसून भोजन करू शकतील अशी, दहा बारा तरी लांब व रूंद टेबले सिमेंटमधेच बांधलेली होती. या टेबलांच्यावर पॉलिश केलेल्या टाईल्स बसवलेल्या असत. खाद्यपदार्थ टेबलांच्या मध्यभागी मोठ्या चिनी मातीच्या बोल्समधे ठेवलेले असत व प्रत्येकाने आपल्याला पाहिजे तेवढे वाढून घ्यावे अशी व्यवस्था असे. आमच्या कॉलेजात, भारतातल्या सर्व राज्यांमधून विद्यार्थी येत ...
पुढे वाचा. : ए स्कूल फॉर एटिकेट्स