नेहमी सारखेच जगत राहायचे. आनंदाने नामस्मरण करायचे. योग्य वेळ झाली की तो आपोआप गवसतो किंवा प्राप्त होतो किंवा अनुभव येतो. योग्य वेळ झाली की नाही हेही तोच ठरवतो. ही होण्याची गोष्ट आहे करण्याची नाही. त्यामुळे यात प्रक्रिया नाही. श्रम नाही. काहीच नाही. मग सांगणार काय? अगदी आत्ता जरी तो मला प्राप्त झालेला असेल तरी त्याची प्रक्रिया मला सांगताच कशी येईल. जे मिळविण्यासाठी मी काहीच केलेलेही नाही करणारही नाही असे असताना ते मिळविण्यासाठी मी काय केले हे सांगणार कसे?
हा माझा आवडलेला मार्ग आहे व तो मी अनुसरत आहे. बस्स इतकेच.