Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:
गेल्या एक तपाहून अधिक काळ या ना त्या कारणाने रखडलेल्या ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयकास शंभराव्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून संमत करून भारतीय स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याची अपूर्व संधी काही करंट्यांनी काल घालवली. या विधेयकावर आजवर एवढा खल झालेला असताना आता त्याला ऐनवेळी पुन्हा खो घालण्याचा प्रयत्न समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी काल ज्या प्रकारे केला, तो साराच प्रकार असभ्यपणाचा होता. राज्यसभेत या विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी आरडाओरड्याचा आधार घेतला गेला आणि राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांच्यापुढील कागदपत्रे ...