मराठीत सांबार म्हणजे कोथिंबीर आणि मद्रासी आमटी. आणि सांबारे म्हणजे काकडी, मुळे वगैरेंचे तुकडे घालून केलेली कढी किंवा आमटी. तर गुजराथीत संभार म्हणजे, (१)दही किंवा फोडणी न घातलेली भाज्यांच्या किंवा कच्च्या पपयीच्या तुकड्यांची कोशिंबीर. ढोकळा किंवा फांफड्याबरोबर ही मिळते. (२) आवश्यक ती सामग्री (३)भाजी किंवा लोणच्यात घालायचा मसाला.
संभारियुं(गुजराथी)= (१) मसाला घातलेले (२) मसाला घातलेली भाजी.
पुण्यात सर्वत्र मद्रासी सांबाराला सांबर म्हणतात, तर गुजराथेत इडलीला इट्टली आणि दोश्याला ठोसा किंवा ढोसा असे पाट्यांवर रंगवलेले आढळते.