sahaj-suchala-mhanun येथे हे वाचायला मिळाले:
रोजच्या सारखाच गजर वाजला तसा माझा दिवस सुरु झाला. नेहमी प्रमाणे मी स्वतःच आवरुन एकिकडे आधण ठेवल नी दुसर्या गॅस वर दुध तापत ठेवल. चहा-दुध होई पर्यंत फ्रिज मधे रात्री मळुन ठेवलेली कणीक, रात्रीच चिरुन ठेवलेली भाजी, खोवलेल खोबर काढुन ओट्यावर ठेवल नी एकिकडे रेडिओच बटण सुरु केलं.