सांबर असें म्हणतात. इडली सांबारच्या सांबारला ब ला काना जोडून आम्हीं सांबार म्हणतो. मीं सातवीत असतांना गांवीं कांदळगांव, मालवण इथें गेलों असतांना काकांच्या दुकानांत कधीं कधीं वेळ घालवायला म्हणून काम करीत असे. किराणा मालाच्या त्या दुकानांत एका ग्राहकानें कोथिंबीर मागितली. मीं म्हटलें आम्हीं भाजी वगैरे ठेवीत नाहीं. चुलत भाऊ हसायला लागला. त्यानें धणे दाखवले व म्हणाला हीच कोथिंबीर बरें.

वरील सर्वच चुटके मस्त आहेत. आमच्या एका मित्राचें लग्न ठरल्यावर त्याला कुणीतरी विचारलें मुलगी कुठली. ठाण्याची असें उत्तर आल्यावर एकानें बोट कानशिलावर लावून स्क्रू पिळल्याची खूण केली व मस्त हशा पिकला होता. पूर्वीं वेड्यांचें इस्पितळ ठाण्याला होतें ना. कृपया हलकेंच घ्या. गम्मत म्हणून मनमोकळेपणें किस्सा सांगितला. दुष्टपणें नव्हें.

सुधीर कांदळकर