इतर वर्तमानपत्रांमधले गंभीर, बोजड आणि उथळ वाचून कंटाळा आला, की मी मधून अधून संध्यानंद चाळतो. 'बिहारमध्ये धनबाद जिल्ह्यात एका बकरीला तीन डोक्यांचे पिल्लू झाले' किंवा 'चिल्का सरोवराच्या तळाशी दडलेल्या गूढ खजिन्याचे रहस्य' अशा खुर्चीत बसून कल्पनेने रचलेल्या बातम्या माझा ताण हलका करतात. हा सलूनमध्ये बसून वाचायचा पेपर आहे. पण त्यालाही वाचकवर्ग आहे. समाजातील एका वर्गाची मनोरंजनाची गरज तो भागवतो. 'डोक्याला ताप नाही' श्रेणी हे त्याचे वर्णन योग्यच आहे.