मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
सदर पोस्ट ही आमच्या ह्या ब्लॉग बद्दल आहे. या ब्लॉगने आम्हाला विचार करायला शिकवले खूप काही छोटे मोठे अनुभव दिले. आपल्याच लिखाणातून आपल्यावर कसे चांगले संस्कार होऊ शकतात याचे आम्ही दोघे म्हणजे अमोल सुरोशे आणि मी ज्वलंत उदाहरण. विचार, लिखाण आणि भाषणे तसं आधी पासूनच करत, पण कधी इतक्या पब्लिक फोरमवर लिहिले नव्हते. २००७ साली शेवटी शेवटी हा ब्लॉग सुरु केला. ब्लॉग साठी नाव शोधत होतो- 'कार्यकर्ता'. कारण नांदेडला असताना बरेचजन कार्यकर्ता म्हणून बोलावत. कॉलेज मध्ये शिवजयंती, भीम जयंती, शेतकऱ्यांसाठी कृषी प्रज्ञा असे काही उपक्रम करत म्हणून! ...