प्रिय ध्येयवेडा,

तुमच्यावर आलेला प्रसंग फारच हृदयद्रावक अशा प्रकारचा आहे. त्यामुळे तुमच्या मनाची अवस्था फार बिकट असणे स्वाभाविक आहे. माझ्या सांत्वना तुमच्यासोबत आहेत.

मला असे वाटते की कधीकधी दुःखाच्या भरात आपण अत्यंत नकारात्मक मानसिकतेत जातो. हे योग्य नाही असे मला वाटते. समाज नावाची जी काही गोष्ट आहे ती आपल्यासारख्याच व्यक्तींनी बनलेली असते. त्यामुळे व्यक्तींमधील गुणदोष स्वाभाविकपणे समाजात येतात. आणि त्यांचे निराकरण हे भावनेने नव्हे तर संयतपणे करणे अधिक योग्य ठरते. असे उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून निराशावादी बनण्याऐवजी एखादे छोटे पण सकारात्मक उदाहरण घेऊन आशावादी राहणे अधिक योग्य असे मला वाटते.