शांत सागरातही
भोवरे नवे नवे
वादळे जुनी परी
भग्न किनारे नवे.. अतिशय उच्च आणि गहिऱ्या अनुभूतीचा प्रत्यय देणाऱ्या ओळी
कविने एकाच प्रकारचे लिहू नये.. सर्व प्रकारचे काव्य लिहून बघण्याचा प्रयत्न व्हायला हवा.. तुझ्या ह्या प्रयत्नाला मी मनापासून दाद देतो.. ह्या कवितेत मला तरी परिपक्वतेची, विरक्तीची एक छटा दिसली.. तुझ्या प्रेम-कविता आम्ही नेहमीच वाचतो.. पण त्याहीपेक्षा मला ही कविता आवडली.. तुझे लिखाण अधिकाधिक अष्टपैलू व्हावे ही शुभकामना!
-मानस६