कधी कधी मनाला उमेद देणाऱ्या घटनाही घडतात.
.... नुकताच घडलेला प्रसंग आहे. बदलापूर स्थानकाबाहेर गाडी पोहोचली होती. एक तरुण उतरण्यासाठी दरवाजाशी आला. त्याला शिंक आली आणि त्याने मानेला दिलेला झटका नेमका बाहेरच्या रेल्वे खांबावर डोके आपटण्यास कारण झाला. तो मुलगा खाली पडला. भुंवई पासून टाळूपर्यंत मोठी जखम झाली. खाली पडल्यामुळे हनुवटी व डोळ्याखाली जखमा झाल्या. कांही मिनिटातच त्या मुलाच्या सहप्रवाशांपैकी कांही जणांनी धावपळ केली. स्थानिक नगरसेवकाने गाडी दिली. त्या मुलाला तांतडीने सायन हॉस्पिटलच्या आय्. सी. यू. मध्ये दाखल केले गेले. जखमावर बरेच टाके घालावे लागले. अठ्ठेचाळीस तास धोक्याचे होते. मुलगा कोम्यात होता. उपचार सुरू झाल्यानंतर त्या मुलाच्या घरी कळविले गेले. त्या मुलाचे वडील आल्यावर त्या मुलाचे सारे सामान त्यांच्या स्वाधीन केल्यानंतर, त्यांना सर्व त्या मदतीचे आश्वासन देऊन ते सहप्रवासी परतले.
अपघातग्रस्त तो तरूण आता सुधारत आहे. त्याच्या जखमा भरत आल्या आहेत. स्मरणशक्तीवर, नजरेवर, एकंदर शारीरिक हालचालींवर झालेल्या परिणामाची गंभीरता आता खूपच निवळली आहे. विशेष म्हणजे हा तरूण एका सामान्य कुटुंबातील आहे.
त्याची आई ठाणे जिल्हयाच्या दुर्गम भागात आरोग्य-सहायिका म्हणून काम करते. वडील साठीच्या पुढचे आहेत. तो मुलगा सी. ए. करीत आहे.
ध्येयवेडाजी, तुमची संवेदनशीलता मात्र वाखाणण्यासारखी आहे. धन्यवाद.