हरिभक्त नमस्कार

तुमचा लेख बरेच काही शिकवून गेला त्याबद्दल धन्यवाद. ओघवत्या भाषाशैलीमुळे निराकारावरील लेखमालावाचून मिळालेला तात्पुरता अनुभवशुन्य आनंद व सदगुरू मार्गदर्शनाने होणाऱ्या ईश आणि इष्ट चिंतनातून सतत मिळणारा अनुभवाचा आनंद यात काजवा आणि सुर्य इतका फरक आहे. तुमच्या लेखामुळे मला जाणवलेला हा फरक अधिक स्पष्ट झाला. 

निराकाराला पाहा असे नुसते सांगून निराकाराला पाहायची ओढ वाढते परंतु पाहायचे काय ? पाहायचे कसे ? पाहायचे कुठे ? हे शाब्दे परेच निष्णात सदगुरुंकडूनच शिकायला हवे.

भारतीय संतांची एक खुबी आहे त्यांनी अंतिम सत्य तर शोधलेच पण तेथपर्यंत सर्वसामान्य माणुस कसा पोहचेल हे सामान्यमाणसाच्या मर्यादा ओळखून, त्याच्या भाषेत त्याला समजावून सांगीतले. हरिपाठात ज्ञानेश्वर महाराज म्हणुनच, " वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू " असे बजावून , " असोनी संसारी जिव्हे वेगू करी " असे कळकळीने सांगतात. सदगुरुचे महत्त्व तर सर्व संतानी एकमुखाने सांगीतले आहे.

तुमच्या उपासनेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या हातून सदगुरुस्मरणात उत्तम लिखाण होवो ही सदिच्छा.