दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:
आपण पांच वर्षापूर्वी मोबाईल कसा वापरत होतो? आज कसा वापरतो? त्यात काही फरक पडला आहे कां? फरक एक नक्की आहे कि जास्त लोक मोबाईल वापरतायत. अगदी कामवाल्या बाईपासून सुतारापर्यंत सर्वांना मोबाईलवर संदेश देऊन वेळाची बचत करता येते. आणि एव्हढे होऊनही फोनबिलची रक्कम वाढल्याचे जाणवत नाही. पण तंत्रज्ञानाचा विचार केला तर चित्र वेगळे दिसते. जीवन क्लेशदायी होत असल्याचे जाणवते.