सर्वप्रथम, प्रतिसाद देऊन हुरूप वाढवल्याबद्दल सर्वांचे आभार.
५ उभे - लसलसता विषयी - मला नक्की आठवत नाही कोणत्या ते, पण दुर्गाबाईंच्या कोणत्यातरी लेखामध्ये काव्य म्हणजे प्रतिभेचा लसलसता कोंब असा उल्लेख होता, त्याचा संदर्भ होता आणि द्विवार उलटा सल (बोच) या सूत्रामुळे लसलस सापडेल असे वाटले...
पण याहूनही काही चांगले शोधसूत्र लिहायला हवे होते असे आता वाटते आहे...
११ व्यात - फसगत - यात 'गत' - हा तंतुवाद्यावर वाजवण्याचा प्रकार फस च्या पुढे आहे (शोधसूत्र बदलताना मुळातील तंतुवाद्याऐवजी नुसते वाद्य दिले गेले आहे, त्यामुळे थोडे चकायला झाले असावे)
कल, रूपा - हे दोन्ही शब्द तयार झाल्याचे माझ्या लक्षातच आले नव्हते ! ते प्रशासकांनी दिले आहेत - त्यामुळे त्याचे श्रेय माझ्याकडे नाही.
शब्दकोडे पुन्हा सुरू केल्याबद्दल प्रशासकांचे आभार.
- पराग जोगळेकर