"मला अजून माहीत नाही रे कोणी नेला ते ..पण तो त्याच जखमी अवस्थेमध्ये २० -२२ मिनिटे पडून होता .. त्याला कोणीच उचलले नाही .. आणि कोणी जास्ती लक्ष पण दिले नाही .. "

हें वाचून वाईट वाटलें. पण स्ट्रॅचर शोधायला जाणें, तो आणणें आणि उचलून इस्पितळांत नेणें यालाही वेळ लागतोच आणि आपल्याला तणावाखालीं हा वेळ प्रचंड वाटतो.

तरी त्याला कोणीतरी २०-२२ मिनिटानंतर कां होईना, इस्पितळांत नेलेंच कीं. मला आजपर्यंत पांच अपघात झाले. पांचवा तर अलीकडेच दि. ४-०१-२०१० रोजीं. त्यापैकीं दोन वेळा माझ्यासोबत कोणीतरी होतें. पण हल्लीचा धरून तीन वेळां मला अपरिचितांनींच अमूल्य मदत केली.

गोल्डन अवर्समध्यें उपचार मिळणें हा तसा योगायोगाचाच भाग मानावा लागेल.

तें कांहींही असो. आपल्या संवेदनाक्षमतेला दाद द्यायलाच पाहिजे.

सुधीर कांदळकर