श्वानविरोधी चळवळ निर्माण झाली पाहिजे आणि पहिला मोर्चा 'पेटा' वर दुसरा मनेका गांधीच्या घरावर. या मनेका गांधीच्या घराच्या आवारात किमान पन्नास व्रात्य कुत्रीं चांगली पंचवीस फूट लांबीच्या दोरीनें झाडाला बांधून ठेवायला पाहिजेत. तरच त्यांना या कुत्र्याचें उपद्रवमूल्य कळेल. या कुत्र्यांच्या स्वातंत्र्यासाठीं आणि पेटावाल्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठीं सामान्य नागरिकांचा विहारस्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे.
अशी संघटना कोणी उभारल्यास पहिलें सदस्यत्त्व माझें असेल. मी तर या कार्यासाठीं एखादें बेकायदेशीर कृत्यही करायला तयार आहे. कायद्यातून पळवाट काढून मी त्यातून खात्रीनें आरामात बाहेर पडेन.
सुधीर कांदळकर.