थेट पॅरिस मधुन... येथे हे वाचायला मिळाले:
आता तुम्ही म्हणाल लोकं पॅरिसमध्ये येऊन काय काय बघतात आणि मी हे काय दाखवतोय... पण हे दर वर्षी भरणारे शेतकी प्रदर्शन इथे बरेच प्रसिद्ध आहे. दर वर्षी होणाऱ्या जागतिक व्यापार प्रदर्शनानंतर याच प्रदर्शनाला सर्वात जास्त गर्दी होते. पॅरिसकरांना एरवी दिसणारे प्राणी म्हणजे पाळलेले कुत्रे-मांजरी आणि चालताना सारखी पायात येणारी कबुतरं (हो, इथे न उडणारी कबुतरं आहेत!!!). याशिवाय गाय-बैल, शेळी-मेंढी, कोंबडी-बदक हे फक्त खाटकाकडेच बघायला मिळतात! अर्थात जिवंत नाही... दुध-चीज ह्या गोष्टी दुकानदार स्वतः तयार करतो असा काहींचा प्रामाणिक समाज असण्याचीही दाट ...