तुम्ही खरेच भाग्यवान आहात.
रावसाहेब मधला विलायत खाँ साहेबांचा किस्सा ऐकला की एकच हळहळ वाटते, कि प्रत्यक्ष त्यांची एकही मैफल ऐकायचा योग आला नाही. (बाकी सुजात हुसैन विलायतखानी परंपरा चालू ठेवोत, आणि किमान आपल्या पिढीला, आणि पुढच्या पिढीलाही चांगलं शास्त्रीय संगीत ऐकायला मिळो)
४-५ वर्षांपूर्वीच्या सवाई मध्ये पं. भीमसेन जोशींचं गायन झालं होतं ते आठवलं. तेव्हा ते थोडेसे आजारी असावेत. आधार घेतच ते मंचावर आले होते, पण गाणं जसजसं रंगत गेलं, तसतसा त्यांचा चेहरा अधिक प्रसन्न दिसू लागला होता.
सुंदर अनुभवकथन! असेच अजून वाचायला आवडेल.