छान माहिती. एकदा नाशिकला फूटपाथवर बसलेल्या पुस्तक विक्रेत्याकडे अडगुलं मडगुलं दिसलं. तोपर्यंत पुस्तकाविषयी माहिती नव्हतं. सहज चाळलं. नि फार छान वाटलं. म्हणून कुतूहलाने विकत घेतलं. घरी आल्यानंतर चाळलं. बायकोनेही वाचलं. ते पुस्तक खूप आव़डलं. त्याचवेळी इतकं चांगलं पुस्तक फुटपाथवर टाकणार्‍याला त्याचं मोल कळलं नाही, याचं वाईटही वाटलं.