दोन मतले लिहून सूट घेता येण्याचा एक सर्वमान्य, प्रचलित नुस्का आहेच. मतल्यातच रदीफ, काफिया, अलामत यांची निश्चिती होत असल्याने तुमच्या गझलेचा विचार करता पहिल्या शेरात 'वतो पुन्हा पुन्हा'ची निश्चिती झाली आहे. तुमच्या दुसर्‍या शेरातही ते पाळले गेले आहे; मात्र पुढे नाही. पहिल्या शेरात जे निश्चित झाले आहे त्याप्रमाणे पुढच्या शेरांमध्येही (गा)वतो किंवा (लल)वतो आले पाहिजे होते. तसे नको असल्यास एकाऐवजी दोन मतले लिहावेत किंवा पहिल्याच मतल्यात 'अतो पुन्हा पुन्हा' निश्चित करावे. चू. भू. द्या. घ्या.