अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:

काही महिन्यांपूर्वी बीबीसी वृत्त वाहिनीने बनवलेली Walking with Dinosaurs ही ऍनिमेशन फिल्म मी बघितली. ही फिल्म अतिशय मनोरंजक व माहितीपूर्ण आहे यात शंकाच नाही. यातले ऍनिमेशन बघून तर मी आश्चर्यचकीतच झालो होतो. या फिल्ममधे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी नष्ट झालेले डायनॉसॉरस प्राणी, त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही फिल्म बघत असताना माझ्या मनात सहज विचार आला होता की डायनो या प्राण्यांच्या विविध जाती प्रजातींची माहिती, भूस्तरामधे सापडलेल्या त्यांच्या जीवाष्म ठश्यांमुळे आपल्याला बर्‍याच अचूकतेने प्राप्त झालेली आहे. ...
पुढे वाचा. : डायनॉसॉरसच्या प्रदेशातील वृक्ष