संतांची भाषा मुळीच संस्कृतप्रचुर नाही. ज्ञानदेवांची मराठी इतकी(त्यावेळच्या) प्राकृत वळणाची आहे की आज ती सहजासहजी समजतही नाही. तुकारामांच्या गाथेची भाषा अगदी रांगडी मराठी आहे. तसे तर आजही बहुजनसमाजाच्या भाषेमधे संस्कृत शब्द असतातच. उदा. शब्द हाच शब्द घ्या. 'एक शब्दही बोलू नकोस' असे म्हणताना 'शब्द' चे संस्कृत असणे आपल्या लक्षात तरी येते का?'भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांचे काठी हाणू माथा' हे काय संस्कृतप्रचुर आहे का? लीळा चरित्र काय संस्कृतप्रचुर आहे? काही थोडे शब्द संस्कृत अथवा श्लोक संस्कृतप्रचुर असले म्हणजे सगळे साहित्य संस्कृतप्रचुर झाले का? अनेक उदाहरणे देता येतील...