झोत वार्‍याचा जसा येतो तशी उडती फुले..
शेवटी येईन मागे मी तुझ्या..थांबूनही.... क्या बात है! बढिया शेर.. तरल
तापते ,भेगाळते ती , ठेचली जाते कधी
ही धरा फुलते कशी (बघा)पण  एवढे सोसूनही ?. हा ही छान आहे,
इथे प्रश्नार्थक ऐवजी विधानात्मक केल्यास अधिक परिणाम साधेल असे माझे मत आहे
बदलले ना सत्य कोणी फार घोंघावूनही... ना ऐवजी का जास्त प्रभावी वाटतोय
मतला एक प्लेन स्टेटमेंट वाटतोय.
ठेवते मी केवळ तुझा चेहरा डोळयापुढे.... लय गेली.. कारण दुसऱ्या गा ल गा गा मधील दुसऱ्या गा चे तू दोन लघू केलेस, त्यातील एक एका शब्दात आहे, आणि दुसरा दुसऱ्या शब्दात आहे.. ळ आणि तु.
ठेवते मी चेहरा केवळ तुझा डोळ्यापुढे.
मन कुठे भरते तरिही सारखे पाहूनही..
मक्ता इटालिक मध्ये का बरे आहे? तो विनोदी भासतोय.. तसे असल्यास गझलेच्या आधीच्या गांभीर्याला त्यामुळे नक्कीच हानी पोहचते. गझलेतील विचार-गुरुत्व चांगले आहे, आणि तेच जास्त महत्वाचे असते असे म्हणतात.
-पु. ले. शु.
-मानस६